उदगीर शहरात मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी रुपयाचा निधी मंजुर : मंत्री ना. संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर : मतदारसंघातील उदगीर व जळकोट तालुक्यात व परिसरात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मराठा समाजाच्यावतीने आयोजित सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एक सुसज्ज वास्तुची आवश्यकता असल्याची अनेक वर्षापासून मागणी होती.

याच मागणीच्या अनुषंगाने नामदार संजय बनसोडे पाठपुरावा करून उदगीर शहरात मराठा भवन बांधकाम करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन 10 कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांनी दिली आहे.

उदगीर जळकोट मतदार संघात मराठा समाज व विद्यार्थांची संख्या लक्षात घेवुन या भागातील मराठा समाज बांधवांनी ना. संजय बनसोडे यांच्याकडे मराठा भवन उभारावे अशी मागणी केली असता ना. संजय बनसोडे यांनी मराठा बांधवांना मराठा भवनाच्या निमिर्तीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देवु असे वचन दिले होते.

त्या दिलेल्या वचनाची वचनपूर्ती आज करुन उदगीर शहरातील मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याने मतदार संघातील मराठा समाज बांधवांकडुन ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले जात आहेत.

उदगीर मतदार संघाच्या विकासाची घौडदौड कायम आहे. दर आठवड्याला कोट्यवधींचा विकास निधी आणून मतदार संघाचा चौफेर विकास केला आहे. ना. संजय बनसोडे यांनी विविध योजनेच्या माध्यमातून जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघात खेचुन आणला आहे. लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात उदगीर मतदार संघाच्या विकासाचा नवा उदगीर पॅटर्न ना. बनसोडे यांनी निर्माण केल्याने त्यांचे मतदार संघातील जनतेला अप्रूप वाटत आहे, मराठा भवन बांधकामासाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

आपण केवळ जनसेवक म्हणून नाही तर कुटुंबातील घटक असल्याचे सांगुन सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून प्रत्येकाच्या सुख दुःखात धावुन जातात. विकासासोबतच मतदार संघातील प्रत्येकाशी आपले भावनिक नाते घट्ट ठेवणारे हक्काचे विकास पुरुष ठरले आहेत.