About

बातमीनामा.कॉम ही मराठीतील एक अग्रगण्य वेबसाइट आहे. अलीकडील काळात मुख्यप्रवाहातील माध्यमांमध्ये वाढलेल्या स्पर्धा आणि खर्चामुळे अनेक तडजोडी केल्या जातात. ज्याच्यामुळे बातम्यांचा आत्मा आणि सामान्य माणसाचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. मुख्य प्रवाहातील माध्यमांत वाढता राजकीय हस्तक्षेप तर कमालीचा वाढला आहे.

माध्यमांचा आवाज दाबण्याचा चौफेर प्रयत्न होत आहे. आर्थिक कोंडी केली जात आहे, सोबतच वाढत चाललेलं पेड न्यूज, फेक न्यूज तसंच इतर गैरप्रकारांपासून पत्रकारितेला दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बातमीनामा.कॉम या गर्दीत सामील न होता आपले वेगळेपण जपणार आहे. बातमीनामा.कॉम तुमच्या विश्वासावर सुरु केले आहे.

मागील २० वर्षाचा माध्यम क्षेत्रातील अनुभव आणि माध्यम क्षेत्रातील अनेक अनुभवी सहकारी मित्रांना सोबत घेऊन ‘बातमीनामा.कॉम’ ची सुरुवात करण्यात आली. ‘बातमीनामा.कॉम’  हा विविध क्षेत्रातील बदलांचा आढावा घेणार आहे. बातमी मागची ‘बातमी’ शोधून बातम्यांचा ‘पंचनामा’ करणार आहे. प्रत्येक बातमीचा समाजात सकारात्मक परिणाम व्हावा हाच उद्देश असेल. कोणतीही न्यूज ‘ब्रेक’ करताना ‘समाज आणि देश’ ब्रेक होणार नाही, याची काळजी घेणार आहोत.

आजच्या बदलत्या राजकीय समीकरणात माध्यमांवर खूप मोठी जबाबदारी आहे. एक चुकीची बातमी समाजाच्या निकोप सलोख्यासाठी घातक ठरू शकते. याचा विचार करून प्रत्येक बातमी, विश्लेषण आणि विचार मांडला जाईल. बातमी देताना कसलाही आतताईपणा होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. आपली मते, सूचना आणि कल्पनांचा कायम स्वीकार केला जाईल. स्वागत केले जाईल. साथ राहू द्या. धन्यवाद.

कोणत्याही माहितीसाठी : [email protected]