Accident News | महामार्गावर थांबलेल्या ट्रकवर दुचाकी धडकून; तरुणाचा जागीच मृत्यू

Accident News

एरंडोल (जळगाव) | महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर हा अपघात झाला. यामध्ये जालना जिल्ह्यातील योगेश निवृत्ती वानखेडे हे त्याचा मित्र भगवान पांडुरंग सोनवणे यांच्यासह पारोळा येथून जळगावकडे दुचाकीने जात होते.

दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास एरंडोल येथील रस्त्यावर चुकीच्या दिशेने ट्रक उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकच्या नकळत भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने ट्रकच्या मागून धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. योगेश वानखेडे या दुचाकी चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा सहकारी भगवान सोनवणे जखमी झाला.

Jio Plans | जिओने या प्लॅनमध्ये ही सुविधा केली बंद, आता मिळणार नाही अतिरिक्त डेटा

अपघाताचा आवाज येताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांची तपासणी केली असता त्यांनी योगेश वानखेडे यांना मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाकडून माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. मयत योगेश वानखेडे हा पूर्वी औषध दुकानात कामाला होता.

Read More 

शेतकऱ्यांची अवस्था बिकट, छ.संभाजीनगर मध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या