राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? विधानसभा अध्यक्ष तडकाफडकी दिल्लीला रवाना

Assembly Speaker Rahul Narvekar leaves for Delhi, 16 MLAs including Eknath Shinde will be disqualified

मोठी बातमी
एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपची पहिली पसंती असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Political Latest News: राज्यातील राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला आता वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता सक्रीय झाले असून कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे.

आमदारांच्या अपात्रतेमुळे शिंदे गटाच्या आमदारांचे टेंशन वाढले आहे. राहुल नार्वेकर येत्या एक ते दोन दिवसांत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे.

दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास सरकार वाचवण्यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपची पहिली पसंती असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

याशिवाय भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई होऊनही भाजपचे विधानसभेत 105 आमदार असून अपक्ष आणि लहान पक्षांसह 40 आमदार अजित पवार यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे बहुमताची अडचण नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविल्यास राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Read More

Politics | उद्धव गटाला धक्का, पुन्हा एका नेत्याचा राजीनामा