आपण एकमेकांचे वैरी नाही; आरक्षणावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न : ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला : आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण तापले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आता पाहायला मिळत आहे. या प्रश्नावरून राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. अकोल्यातील जिल्हा परिषद करंबा भवनात ओबीसी संवाद बैठक झाली. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. जालन्यातील ओबीसी सभेतून मनोज जरंगे पाटील यांना आव्हान देण्याची छगन भुजबळांना काय गरज होती? असा थेट सवाल त्यांनी केला.

दरम्यान, आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही लोक राज्यात दोन समाजात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही जिल्हा-जिल्ह्यात सभा घेणार आहोत. भुजबळांना राजकीय आव्हान देऊन चिथावणी देण्याची काय गरज होती? आरक्षणावरून आप आपसात लढून काय साध्य होणार? राज्यात आपण एकत्र राहू. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीतच सोडवता येईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे सर्व करीत असताना आरक्षणाला धक्का लागणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली जाऊ शकते. परंतु अभ्यास न करता या विषयावर भाष्य करण्याची गरज नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगे यांच्या बोलविता धनी कोण हे राज ठाकरे यांनी विचारले पण राज ठाकरे यांचा बोलविता धनी कोण? असा सवालही त्यांनी राज ठाकरेंना केला.

Read More 

राहुल गांधी ‘मूर्खांचे सरदार’ असल्याची टिका, मोदी का करीत आहेत?