लातूरच्या अविष्कार कासलेची कोटामध्ये आत्महत्या, एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले

Avishkar Kasle of Latur commits suicide in Kota

कोटा (राजस्थान) 27 ऑगस्ट | देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटा येथे येतात. रविवारी दुपारी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने कोटा येथे आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील उजना गावातील अविष्कार संभाजी कासले (17 वर्षे) हा कोटा येथे शिकत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती अहमदपूर तालुक्यातील उजना गावात समजताच सर्वांनाच धक्का बसला.

आविष्कारचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. ते अहमदपूरमध्ये राहतात. त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबादमध्ये शिकतो. मोठ्या मुलाने कोटा येथून शिक्षण पूर्ण केले. त्याचे यश पाहून अविष्कारलाही शिक्षणासाठी कोटा येथे पाठवण्यात आले. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अविष्कारने दुपारी 3.15 च्या सुमारास जवाहरनगर येथील कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू  

आत्महत्येपूर्वी आविष्कारने त्याच कोचिंग क्लासच्या तिसऱ्या मजल्यावर परीक्षा दिली होती. कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आविष्कारसाठी रुग्णवाहिका बोलावली, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अविष्कारचा रस्त्यातच मृत्यू झाला. आत्महत्येची माहिती समजताच सर्व नातेवाईकांना धक्का बसला आहे. अविष्कारच्या आत्महत्येची माहिती अद्याप अविष्कारच्या आईला देण्यात आलेली नाही. मृतदेह आणण्याची तयारी करण्यात आली आहे. आज सायंकाळी किंवा नंतर मृतदेह उजना या मूळ गावी आणण्यात येणार आहे.

सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात अंगलट येणार? बच्चू कडू आक्रमक

कोटा येथे एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

अविष्कारच्या आत्महत्येनंतर चार तासांनंतर कोटामध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आदर्श राज (18 वर्षे) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. त्यांनी सायंकाळी सात वाजता कुन्हडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी साडेसात वाजता आदर्शची बहीण आणि चुलत भाऊ फ्लॅटवर पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ती लटकलेला होता. आदर्शला तत्काळ खाली उतरविण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देशभरातून विद्यार्थी कोटा येथे येतात. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी कोटातील सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल कोटा येथे लातूरच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. कोटा येथील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More 

वर्गात फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक