मोठा निर्णय : अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी? पुण्यातील राजकारण बदलणार?

Raj Thakarey - Amit Thakrey

पुणे, 26 ऑगस्ट | लोकसभा निवडणुकीसाठी केवळ आठ ते नऊ महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीची बैठक पुढील आठवड्यात मुंबईत होणार आहे.

या बैठकीला देशभरातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे NDA ने देशभर रॅली काढायला सुरुवात केली आहे. देशातील अनेक लहान पण अधिक राजकीय उपद्रव्य मूल्य असलेल्या राजकीय पक्षांनीही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात मनसेनेही लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय : मणिपूर हिंसाचाराची सीबीआय चौकशी गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग

पुणे हा त्यापैकीच एक मतदारसंघ आहे. पुण्यातून मनसेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यामुळे अमित ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारासाठी सर्व शक्ती आणि कौशल्य पणाला लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे दिल्यास पुण्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

वसंत मोरे यांच्याकडून जबाबदारी काढून घेतली

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरे यांच्याकडे पुण्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा जिंकण्यासाठी राज ठाकरे यांनी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

यापूर्वी बारामती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे देण्यात आली होती. पण पुणे काबीज करण्यासाठी राज ठाकरेंनी युवा नेते अमित ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे.

पक्षबांधणी, उमेदवार निवड, प्रचार अशा विविध जबाबदाऱ्या अमित ठाकरे पार पाडतील का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. अमित ठाकरे स्वतः उमेदवारांच्या स्क्रिनिंग आणि मुलाखतींचा आढावा घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

वसंत मोरे यांना हटवण्याचे कारण काय?

पुणे मनसेमध्ये सर्व काही ठीक नाही. पुण्यात मनसेचा मोठा गट वसंत मोरे यांच्या विरोधात आहे. या गटाकडून वसंत मोरे यांना कार्यक्रमातून वगळण्यात येत आहे.

पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत मोरे यांचा सहभाग नसल्याचे सांगण्यात येते. वसंत मोरे यांनी याबाबत राज ठाकरे यांच्याकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही.

पक्षातील या अंतर्गत वादामुळे कार्यकर्ते वसंत मोरे यांच्या हाताखाली काम करण्याची शक्यता कमी असल्याने अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मोरे काय कोणती भूमिका घेणार?

दरम्यान, वसंत मोरे यांनी अनेकदा पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत राज ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र, त्यांच्याकडून पुणे लोकसभेची जबाबदारी काढून अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाल्याचे बोलले जात आहे.