Big Update | अखेर एकदाचे ठरले, ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? महत्त्वाची अपडेट

Big Update | Finally decided who is prime ministerial candidate of 'India' alliance?

मुंबई, 27 ऑगस्ट | शात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2024 मध्येही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जाहीर केले आहे. पण ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘राहुल गांधी’ काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांनी चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचेही गेहलोत म्हणाले. इंडिया टुडेशी बोलताना गेहलोत यांनी ही माहिती दिली.

‘इंडिया’ आघाडीवर भाष्य करताना गेहलोत म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्वच पक्षांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे, असा दबाव जनतेनेच निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी युती केल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहंकार बाळगू नये. 2014 मध्ये भाजपला केवळ 31 टक्के मते मिळाली होती. उर्वरित 69 टक्के मते त्यांच्या विरोधात होती. गेल्या महिन्यात बंगळुरूमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांची बैठक झाली तेव्हा ‘एनडीए’ घाबरला होता, असेही गेहलोत यांनी नमूद केले.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए 50 टक्के मतांसह सत्तेवर येईल या दाव्यांबद्दल विचारले असता ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हे कधीही साध्य करू शकणार नाहीत. ते त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना हे करू शकले असते. मात्र आता त्यांना 50 टक्के मतेही मिळू शकत नाहीत. उलट त्यांची मतांची टक्केवारी आणखी कमी होईल. तर 2024 मध्ये पंतप्रधान कोण होणार? यावरून आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल निश्चित होणार आहेत.

Read More 

पंचनामा : आगामी निवडणुकांत ‘इगो’ बाजूला सारून लढावे लागेल