Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडेची प्रेग्नन्सी टेस्ट? नावेद सोलने केला मोठा खुलासा

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’चा 17वा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसमधील प्रत्येक स्पर्धकाने त्याच्या खेळावर एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही तिचा पती विकी जैनसोबत ‘बिग बॉस’च्या 17व्या सीझनमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्याबाबत वेगळीच चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता गुड न्यूज देणार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच अंकिताने बिग बॉसच्या घरात गर्भधारणा चाचणी दिली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. इतकंच नाही तर तिला आंबट खायची इच्छा असल्याचंही तिने सांगितलं. अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. आता नावेद सोलने खुलासा केला आहे की अंकिता खरोखरच प्रेग्नंट आहे की नाही. नावेद नुकताच बिग बॉसमधून बाहेर पडला होता, मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर नावेदने अनेक खुलासे केले आहेत.

नावेदने अंकिता लोखंडेच्या गरोदरपणावरही भाष्य केले आहे. नावेद म्हणाला, सध्या सर्व काही सकारात्मक दिशेने जात आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे. अंकिताने मला वचन दिले की ती तिच्या बाळाचे नाव ठरवण्यासाठी माझी मदत घेईल. अंकिताच्या बाळाचे हिंदी आणि पाश्चात्य नावांचे मिश्रण करून आम्ही नवीन नाव तयार करू. माझ्या मनात काही नावे आहेत, पण योग्य वेळ आल्यावरच मी ती शेअर करेन.

अंकिता या महिन्याच्या सुरुवातीला बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये पती विकी जैनसोबत तिच्या मूड स्विंगबद्दल बोलताना दिसली होती. अंकिता म्हणाली, मला वाटते की मी आजारी आहे, मला आतून वाटते की मी बरी नाही. मला मासिक पाळी येत नाही. मला घरी जायचे आहे; इतकेच नाही तर अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नेंसी टेस्टही दिली होती.