दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर : नाना पटोले

Nana Patole

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत आहे. येथे शेतकरी मरत आहेत. मात्र राज्य सरकारला कोणाचीच फिकीर नाही. महाराष्ट्र सरकार हे स्वार्थी सरकार असून दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रिपदावर डोळेझाक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra state president Nana Patole) यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, हे असंवैधानिक सरकार असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यामुळे आम्ही जे बोललो ते खरे ठरते, जे लोक तेथे गेले ते सर्व ईडीच्या भीतीने गेले आहेत.

संपूर्ण राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे, दुष्काळ आहे. अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पाणीच नाही. कोरडा दुष्काळ आहे. मात्र सरकार दुष्काळ जाहीर करत नाही, असेही पटोले म्हणाले.

Read More 

Israel-Hamas Conflict | इस्रायली महिलेची विवस्त्र धिंड; हमासच्या दहशतवाद्यांकडून माणुसकीला काळीमा