शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं ‘या’ तारखेला महाराष्ट्रात येणार

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं

Chhatrapati Shivaji Maharaj | महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघ नखं’ लंडनमधून परत आणण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. 16 नोव्हेंबरला महाराजांची ‘वाघ नखं’ मुंबईत आणण्यात येणार आहे. यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या लंडनला रवाना होणार आहेत.

महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघ नखं’ भारतात आणण्यासाठी राज्य सरकार लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाशी 3 ऑक्टोबर रोजी करार करणार आहे.

या करारानंतर पुढील तीन वर्षांसाठी महाराजांची ‘वाघ नखं’ महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या वाघ नखांच्या मदतीने अफझलखान्याचा कोथळा बाहेर काढला. तिचं महाराजांची ‘वाघ नखं’ भारतात आणली जातील आणि येथील लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल.

दरम्यान, या वाघ नखांना महाराष्ट्रात आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही त्यांच्यासोबत राहणार आहेत. वाघ नखं महाराष्ट्रात येताच मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली आहे.

असा असेल वाघ नखांचा प्रवास

  1. 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघ नखं मुंबईत दाखल होतील.
  2. 17 नोव्हेंबर रोजी सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघ नखांची प्रतिष्ठापना करण्यात येईल.
  3. 17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट 2024 या कालावधीत सातारा येथे वाघ नखांचे प्रदर्शन होणार आहे.
  4. 15 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत नागपूर येथील शासकीय संग्रहालयात वाघ नखांना ठेवण्यात येणार आहे.
  5. एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत वाघ नखांना कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
  6. नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 या कालावधीत वाघ नखांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केले जातील.
  7. 16 नोव्हेंबर 2026 रोजी वाघ नखांना लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट संग्रहालयात परत पाठवले जाईल.

Read More 

Stamp Paper | 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद