Crime News | ट्रेनमध्ये कॉलेज तरुणीचा विनयभंग; ट्रेन अटेंडंटला अटक

crime-batminama

Molesting College Student : रेल्वेत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी 19 वर्षीय ट्रेन अटेंडंटला अटक केली आहे. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

ट्रेनमध्ये मुलीचा विनयभंग

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन तरुणी मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत मुंबईत फिरायला आली होती. पीडितेने मुंबईचा आनंद लुटला आणि ट्रेनने परत जात होती. 21 फेब्रुवारी रोजी देवगिरी एक्स्प्रेसने संभाजीनगरला जात असताना आरोपीने तरुणीला ट्रेनमध्ये स्पर्श केला. तिने आरडाओरडा करताच तिच्या मित्रांनी आणि प्रवाशांनी आरोपीला पकडले.

प्रवाशांनी आरोपीला पकडले

ही गाडी सीएसएमटी ते संभाजीनगर अशी सोडण्यात आली. यावेळी प्रवाशांनी आरोपीला पकडले. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दीपक पार्टे असे आरोपीचे नाव असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी हा 19 वर्षीय ट्रेन अटेंडंट आहे.

गुन्हा दाखल 

ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण सीएसएमटी पोलिसांकडे वर्ग केले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलिसांनी दिली आहे.