Crime News | बहिणीने तक्रार केल्याच्या रागातून दलित मुलाला ठार मारले, आईला केले विवस्त्र

Crime News | Dalit boy killed, mother stripped, out of anger over sister's complaint

भोपाळ, 27 ऑगस्ट | मध्य प्रदेशातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका दलित मुलाला मारून त्याच्या आईला विवस्त्र केले गेले आहे. मुलाच्या बहिणीने 2019 मध्ये चार जणांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीवरून रागाच्या भरात काही लोकांनी घरात घुसून पीडितेच्या मुलाला बेदम मारहाण केली. यादरम्यान त्यांनी मुलाच्या आईचे कपडे फाडून विवस्त्र केले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, निवडणुका जवळ आल्याने याला राजकीय वळण प्राप्त झाले आहे.

याप्रकरणी मृत मुलाच्या बहिणीने सागर जिल्ह्यात फिर्याद दिली होती. काही लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप बहिणीने केला आहे. तक्रार मागे न घेतल्याच्या रागातूनच सदरील गुंडांनी हा हल्ला केला असल्यची तक्रार केली आहे.

पीडितेच्या आईने सांगितले की, मुलाला खूप मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याचा जीव गेला. मला विवस्त्र केले गेले. पोलिस आल्यावर त्यांनी मला अंग झाकण्यासाठी टॉवेल दिला. साडी मिळेपर्यंत मी त्याच अवस्थेत होते.

आरोपींनी घर फोडले. घरात एकही वस्तू ठेवली नाही. तसेच घराचे छतही पाडले. त्यानंतर त्यांनी माझ्या इतर दोन मुलांचा शोध सुरू केला, असे पीडितेच्या आईने सांगितले. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या घरात घुसून माझ्या पतीला आणि घरातील मुलांना मारहाण केली, असे मुलाच्या काकूने सांगितले.

गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीडितेने फिर्याद दिल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली. सध्या प्रकरण न्यायालयात आहे. तेव्हापासून तिला सतत धमक्या देण्यात येत होत्या.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनीही यात उडी घेतली आहे.

काँग्रेस आणि मायावतींच्या बसपने भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मध्य प्रदेशातून दलित आणि आदिवासी समाजावर अत्याचार सुरूच आहेत. राज्यात दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. भाजपने मध्य प्रदेशला दलितांवरील अत्याचाराची प्रयोगशाळा बनवली आहे.

Read More 

Crime News | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव, 35 वर्षीय पत्नीला अटक