Crime News | दारू आणण्यासाठी मित्राला पाठवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Dombivali Crime News

Crime News : मित्राला दारू आणायला पाठवून तरुणीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. दोन आरोपींपैकी एक दिनेश याला डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस दिनेशचा साथीदार सुनील याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. ती आपले राहते निवासस्थान सोडण्याच्या तयारीत होती. तिने सर्व सामान तिच्या ओळखीच्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पीडित मुलगी आणि तिचा मित्र तिचे सामान तपासण्यासाठी गेले होते.

त्या दोघांचे ओळखीचे दिनेश आणि सुनील घरी होते. दोघांनी पीडितेच्या मित्राला दारू आणण्यास सांगितले. तिचा मित्र दारू आणण्यासाठी निघून गेला. मुलगी घरी एकटीच होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.

या दोन नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर पिडीत युवती घराबाहेर मदतीसाठी धावू लागली. तिच्या पाठोपाठ दिनेशचा मित्र सनील याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि रिक्षात तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने विष्णुनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे, महिला पोलिस अधिकारी मेघा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दिनेशला अटक केली आहे. त्याचा मित्र सुनीलला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Read More 

Crime News | पती-पत्नीत वाद; दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात