Crime News | लिव्ह इन रिलेशनपचा भयावह अंत, प्रेयसीच्या डोक्यात प्रेशर कुकर घालून हत्या

Crime News

बेंगळुरू, 27 ऑगस्ट | मागील काही वर्षात लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाण वाढले आहे. अनेक तरुण मुलं-मुली प्रेमात पडतात आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. दोघेही कुटुंबापासून दूर एकटे राहत असल्याने त्यांना त्यांच्यातील अनेक पातळीवर संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधील अनेक धक्कादायक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. श्रद्धा वॉकरसारख्या अनेक घटना घडत आहेत. याप्रकरणी बेंगळुरूमधूनही एक घटना समोर आली आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याच्या वादातून एका तरुणीचा डोक्यात प्रेशर कुकर मारून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजता बेंगळुरूमध्ये उघडकीस आली. वैष्णव असे आरोपीचे नाव असून पीडित देवी हिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात देवी हिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देवीच्या बहिणीने तिला फोन केला. अनेक फोन करूनही देवी हिने फोन उचलला नाही. त्यामुळे बहिणीने देवीच्या शेजाऱ्यांना बोलावून ते देवीला देण्यास सांगितले. शेजारी देवीच्या घरी गेल्यावर वैष्णव यांनी त्यांना निरर्थक व उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्याने शेजाऱ्यांना घरातही प्रवेश दिला नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची पाहणी करून वैष्णवची कसून चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, देवी आणि वैष्णव दोघेही मूळचे केरळचे आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून ते एकमेकांवर प्रेम करत होते. नंतर त्यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती होती. देवी आणि वैष्णव या दोघांमध्ये सतत वाद होत असत. शनिवारी हा वाद वाढत गेला आणि देवीला आपला जीव गमवावा लागला.