Crime News | पती-पत्नीत वाद; दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

Crime-News-murder

वरणगाव (जळगाव) 19 सप्टेबर | हातनूर (जि. भुसावळ) येथील शेतशिवार येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये सोमवारी किरकोळ वादावादी झाली. या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (18 सप्टेंबर) पहाटे घडली. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वरणगाव पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

जितेंद्र गंगाराम हेमब्रम आणि शांताबाई हे उत्तर प्रदेश राज्यातील राजकिशन कॉलनी शक्तीनगर (जिल्हा सोनभद्र) येथील विवाहित जोडपे आहे. ते शेततळ्याचे काम करत असल्याने जितेंद्र हेमब्रम जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हातनूर येथील शेतशिवार येथे पत्नी शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम यांच्यासोबत राहतात. हे दाम्पत्य शेतातील घरात राहत असून, रात्री त्यांच्यात वाद झाला. या वादात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पती जितेंद्र याने पत्नी शांतादेवी हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबला, त्यामुळे शांतादेवीचा जागीच मृत्यू झाला.

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीने केली आत्महत्या

पतीला ताब्यात घेतले

या घटनेची माहिती वरणगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित पतीने दारू प्यायल्याने व राग आल्याने ही घटना घडल्याचे घटनेचे साक्षीदार व मयत शांतादेवी यांनी उघड केले आहे. पत्नीचा मारेकरी जितेंद्र याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. शांतीदेवी यांचा मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी पाठवला आहे. वरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी, किशोर पाटील तपास करीत आहेत.

Read More 

Milk Business | गायींच्या या तीन जाती अतिशय फायदेशीर, दररोज 50 लिटरहून अधिक दूध, जाणून घ्या