Crime News | पाचवीच्या विद्यार्थिनीवर ६८ वर्षीय व्यक्तीकडून महिनाभर बलात्कार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Minor Girl Raped By 68 Year Old Man in Bengal

दार्जिलिंग : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधून एक भयानक घटना समोर आली आहे. येथे एका 68 वर्षीय व्यक्तीला एका अल्पवयीन मुलीवर सतत महिनाभराहून अधिक काळ बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचारानंतर आरोपी प्रत्येक वेळी पीडितेला 10 रुपये देत असे आणि घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसवत होता.

इयत्ता 5वीत शिकणाऱ्या पीडित मुलीने तिच्या आईला ही भीषण घटना सांगितल्यानंतर सोमवारी या मुलीवर होणारा किळसवाना प्रकार उघडकीस आला. यानंतर तिच्या आईने पोलिसांची भेट घेऊन त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. ही घटना दार्जिलिंग जिल्ह्यातील खोरीबारी भागातील पानीशाली ग्रामपंचायतीत घडली.

पोलिस एफआयआरनुसार, मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. तिच्या घराजवळ राहणारा आरोपी म्हातारा तिच्यावर बलात्कार केल्यानंतर दरवेळी तिला 10 रुपये द्यायचा. आरोपीने पीडितेला बलात्काराबाबत कोणाला सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकीही दिली होती.

पीटीआयने पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, आईच्या तक्रारी आणि पीडितेच्या साक्षीच्या आधारे, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read More 

मराठा आरक्षण | कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत आठ दिवसांत अहवाल द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश