Crime News | पोलीस कर्मचाऱ्याने चार महिन्यांच्या बाळाचा रस्त्यावर आपटून घेतला जीव

Raibag (District Belgaum

रायबाग, जिल्हा बेळगाव, 20 सप्टेंबर | पत्नीने उद्या गावाला जाऊ असे सांगितल्याने रागाच्या भरात एका व्यक्तीने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर आपटले, त्यात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (18) चिंचाळी, रायबाग येथे घडली.

संचित बसप्पा बालनुकी (वय 4 महिने) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बसप्पा रंगप्पा बालनुकी आहे. बसप्पा हे KSISF मध्ये पोलीस आहेत. या घटनेची कुडची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कुडची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बसप्पा हा अथणी तालुक्यातील दुरदुंडी येथील रहिवासी आहे. 19 महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले.

त्याच्या पत्नीचे माहेर चिंचली आहे. ती माहेरी असल्याने बसप्पा पत्नीला आणण्यासाठी सायंकाळी सासुरवाडी येथे गेला होता. यावेळी त्यांच्या पत्नीने आज सण आहे, उद्या जाऊ, असे सांगताच बसप्पा संतापला. त्याने पत्नीला आजचं जाण्याचा हट्ट करू लागला.

मात्र, पत्नीने ऐकले नाही म्हणून त्याने घरासमोर जाऊन आपल्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर नेऊन आपटले. यात बाळाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी बाळाला तातडीने रुग्णालयात नेले; मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला.

बसप्पा हे बेळगाव-सांबरा येथील केएसआयएसएफमध्ये राखीव पोलीस आहेत. या प्रकाराची नोंद सोमवारी कुडची पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आज बाळनुकीला अटक केली. त्यांची रवानगी गोकाक उप कारागृहात करण्यात आली आहे.

Read More

Crime News | पती-पत्नीत वाद; दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात