Crime News | चोरा सोबतच सापडली महिला पोलीस; विचित्र प्रकारामुळे खळबळ

Crime-news-Mumbra Police-woman

मुंबई, 26 ऑगस्ट | मुंबईतील मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र या महिला सहायक पोलिस निरीक्षकाने चोरट्याला पकडण्याचे टाळत थेट रजेवर निघून गेल्या. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात हे अधिकारी मोबाईल चोरासोबत सापडले. या विचित्र प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

साबीर शेर अली सय्यद असे आरोपी मोबाईल चोराचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले असता महिला पोलीस अधिकारी आणि आरोपी यांच्यात अनेक कॉल्स झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

Crime News | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव, 35 वर्षीय पत्नीला अटक

खेरवाडी पोलीस साबीर शेरअली सय्यदवर नजर ठेवून असतानाच तो नवी मुंबईहून मुंबईत येत असल्याची खेरवाडी पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. मात्र, तो आरे येथे येताच त्याचा मोबाइल बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याचे मोबाईल लोकेशन आरे असल्याने पोलिसांनी परिसरात कारवाई केली.

यावेळी ती पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले. यानंतर खेरवाडी पोलिसांनी या हॉटेलवर जाऊन कारवाई केली. त्यानंतर पोलिसांना मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींसोबत मुंब्रा पोलीस स्टेशनची एक महिला पोलीस कर्मचारी सापडली.

Read More 

मोठा निर्णय : अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी? पुण्यातील राजकारण बदलणार?