नागपूर | डमी ग्राहक पाठवला, नंतर पोलिसांनी टाकला छापा; स्पा सलूनच्या नावाने सुरू होता ‘धंदा’

crime-batminama

Crime News : नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी शहरात मोठी कारवाई केली आहे. ड्रीम सलून आणि स्पा या नावाने चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

एकाला पोलिसांनी अटक केली असून दोघे फरार 

नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळक नगर परिसरात ड्रीम सलून आणि स्पा या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. डमी ग्राहक पाठवून केलेली कारवाई ही वेश्या व्यवसायाची असल्याने एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच या प्रकरणातील दोन जण फरार झाले आहेत. निर्भय बलबीर असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच स्पा मालक रवी कात्रे आणि सहकारी रवी साहू फरार आहेत. या सलूनमधून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

स्पा च्या नावावर वेश्याव्यवसाय

अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील टिळक नगर येथे ‘ड्रीम’ सलून फॅमिली स्पा नावाने वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी एकाला ग्राहक म्हणून पाठवून खात्री केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने आत जाऊन कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांना तीन बळी सापडले. पोलिसांनी त्यांची सुटका केली. या प्रकरणी मालक यश कात्रे आणि सहकारी रवी शाहू यांचा सध्या शोध सुरू आहे.

तरुणींना पैशाचे आमिष दाखवले

उपराजधानी नागपुरात सलून आणि स्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर येत आहे. आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत तरुणींना पैशाचे आमिष दाखवले जात आहे. त्यांना या व्यवसायात ढकलून ते स्पाच्या नावाखाली हा व्यवसाय चालवत आहेत. त्यामुळे अशा स्पा आणि सलूनच्या आडून चालणाऱ्या देहविक्री करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.