Crime News | गतिमंद मुलीसोबत दुष्कर्म, गर्भवती राहिल्याने उघडकीस आला प्रकार

Rape crime

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर गावात एक घटना उघडकीस आली आहे. एका 54 वर्षीय नराधमाने 23 वर्षांच्या गतिमंद तरुणीसोबत दुष्कर्म केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी शाहूवाडी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अनिलविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही पोलिसांनी संशयिताला अटक केली नसल्याने याविरोधात आज मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती.

तरुणीच्या असहायतेचा फायदा घेऊन माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, तसेच संशयित आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, या मागणीसाठी आज मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर शहरातील महिला, युवक, युवती व नागरिकांनी मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून संशयित आरोपींला अटक करण्याची मागणी करत शहरभर मूक आंदोलन केले.

आंदोलक महिलांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे यांना निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Read More

Minor Girl Raped : पुन्हा एकदा निर्भयासारखं बलात्काराचं प्रकरण, अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा