Crime News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरकडून हत्या

Crime-News-murder

Crime News : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेकडील विजयनगर येथील आमराई परिसरात एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. रसिका असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी विजयला पोलिसांनी अटक केली आहे.

रसिका आणि विजय दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विजयला रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून आज विजयने रसिकावर चाकूने वार करून तिची राहत्या घरी हत्या केली.