Crime News | चोरीच्या संशयातून दलित तरूणांना मारहाण; श्रीरामपूर येथील घटना

Dalit youth beaten

अहमदनगर, 26 ऑगस्ट | अहमदनगर जिल्ह्यातून एका तरुणाला झाडाला बांधून अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेळी चोरीचा संशय आल्याने ही घटना घडली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडली.

अधिक माहितीनुसार, या दलित तरुणांवर बकऱ्या आणि कबुतरे चोरल्याचा संशय होता. पिडीत तरुणाला घरातून नेऊन झाडाला उलटे लटकवले असल्याची माहिती पीडित कुटुंबीयांनी दिली आहे. या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, खंडागळे हे गंभीर जखमी झाले. पिडीत तरुणाला शिरापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Crime News | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव, 35 वर्षीय पत्नीला अटक

दरम्यान, याप्रकरणी दलित संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात तरुण झाडाला उलटा लटकलेला दिसत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.