फडणवीसांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची साथ सोडा; मराठा आंदोलकांची अजित पवारांना विनंती

Either resign or leave Fadnavis; Maratha protesters' request to Ajit Pawar

बारामती, 3 सप्टेंबर | बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.

यावेळी काटेवाडी सोसायटीचे अध्यक्ष स्वप्नील काटे म्हणाले, जालन्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने येथे जमलो. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करण्याचा निर्धार करण्यात आला.

मात्र, यावेळी अजितदादांचा फोटो का नाही, अशी विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे प्रमुख म्हणून फुली मारलेले फोटो लावून जालना येथील घटनेला जबाबदार असलेल्या गृहमंत्र्यांचा निषेध करण्यात आला.

अजितदादांना आम्ही समस्त काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की, त्यांनी एकतर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा द्यावा किंवा त्यांची साथ सोडावी. आम्ही सकल मराठा समाज तुमची वाट पाहत आहोत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना अमोल काटे म्हणाले की, जालना येथील घटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वस्वी जबाबदार आहेत. या ठिकाणी आंदोलकांवर अमानुष हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आली.

यावेळी लहान मुले आणि महिलांनाही सोडले नाही. पोलिसांवर आमचा राग नाही. वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांनी हे केले. मात्र त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांवर आमचा राग आहे. गेल्या सात वर्षांत मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले, मात्र कुठेही अनुचित घटना घडली नाही.

हे शांततापूर्ण आंदोलन सरकारने दडपण्याचा प्रयत्न का केला? हा खरा सवाल आहे. कारण जालन्यात काही दिवसांत राज्य सरकारचा उपक्रम होणार आहे. कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.

अनेक आंदोलकांवर तसेच तरुणींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार संतापजनक असून मराठा समाजाच्या भावना दुखावणारा आहे, त्यामुळे आम्ही हा निषेध करत आहोत, असे काटे यांनी सांगितले.

Read More 

‘इंडिया’ ची पुढील बैठक कुठे होणार आहे? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर