प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीने केली आत्महत्या

16-year-old daughter of famous Tamil actor commits suicide

Filmy News | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि संगीतकार विजय अँटोनी (Vijay Antony is a Famous Actor, Producer and Music Composer of Southern Cinema) यांच्या 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. आज पहाटे ३ वाजता तिने चेन्नईतील अल्वरपेट येथील राहत्या घरी गळफास लावून घेतला. या घटनेने अभिनेत्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीतही खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, विजय अँटोनी यांची मुलगी मीरा हिचा चेन्नईतील त्यांच्या घरी पहाटे 3 वाजता लटकलेल्या अवस्थेत आढळून आली, ती 16 वर्षांची होती आणि चेन्नईतील एका प्रसिद्ध शाळेत शिकत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयची मुलगी डिप्रेशनने त्रस्त होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते.

घरच्या मदतनीसाला मीरा तिच्या खोलीत लटकलेली आढळली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस अधिकारी सध्या या घटनेचा तपास करत आहेत. याबाबत विजय आणि त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

विजय अँटनी हे प्रसिद्ध तमिळ संगीतकार आहेत. अनेक वर्षे संगीतकार राहिल्यानंतर त्यांनी निर्माता, अभिनेता, गीतकार, एडिटर, ऑडिओ इंजिनिअर आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी फातिमा विजय अँटोनी यांच्याशी विवाह केला. त्यांना मीरा आणि लारा या दोन मुली आहेत. संगीतकार विजय अँटनी सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘रथम’च्या रिलीजमध्ये व्यस्त आहेत.

Read More 

PM Kisan Samman Yojana : अपात्र शेतकऱ्यांकडून सरकार पैसे करणार वसूल, यादीत तुमचे नाव तपासून पहा