मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; 38 वर्षीय व्यक्तीला अटक

female doctor raped in Mumbai

मुंबई : मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडितेची एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळताना भेट झाली. घरगुती कारणांमुळे महिला पतीपासून वेगळ्या राहत होत्या. दरम्यान, पीडिता आणि तिच्या पतीमधील वाद मिटवतो असे सांगून आरोपीने पीडितेला विश्वासात घेतले. यानंतर 20 ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेला एका क्लबमध्ये बोलावले.

क्लबमध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडितेला दारू पिण्यास भाग पाडले. तसेच आरोपीने पीडितेला कारमध्ये आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, आरोपींनी पीडितेचे अश्लील व्हिडिओही काढले. तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच या व्हिडिओच्या आधारे आरोपींनी महिलेकडून पैसेही उकळले.

दरम्यान, आरोपींच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत असल्याने अखेर पीडित महिलेने गावदेवी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.