दिल्लीत 34 वर्षीय मुस्लिम तरुणाने चार वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार, पांडवनगरमध्ये तोडफोड आणि तणाव

Minor Girl Raped By 68 Year Old Man in Bengal

Crime News | दिल्लीत एका चार वर्षांच्या मुलीवर तिच्या शिकवणीच्या ठिकाणी बलात्कार झाला. मुलगी जिथे शिकवायला जाते तिथल्या 34 वर्षीय मुस्लिम तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आज पांडवनगरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यांनी तोडफोड केली आणि घोषणाबाजीही केली. या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

एका 34 वर्षीय मुस्लिम तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. ही घटना शनिवारी घडल्याचे दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सागर सिंह यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही 34 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पांडवनगरात आज काय घडलं?

4 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर पांडवनगर परिसरात जमाव संतप्त झाला. जमावाने ठिकठिकाणी गाड्या आणि इतर भागांची तोडफोड केली. यानंतर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या ज्यात मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

काही लोकांनी या अफवांवर विश्वास ठेवून तोडफोड केली. मात्र कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मी करतो. दिल्ली पूर्व डीसीपी अपूर्व गुप्ता यांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.