Home बातमी मतदार संघातील विविध विकास कामांसाठी मूलभूत सुविधे अंतर्गत १० कोटी रुपयाचा निधी...

मतदार संघातील विविध विकास कामांसाठी मूलभूत सुविधे अंतर्गत १० कोटी रुपयाचा निधी मंजुर : ना. संजय बनसोडे

Farmers in all revenue boards will get peak insurance advance: Na. Sanjay Bansode
उदगीर : राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मतदार संघातील विविध गावांतील विकास कामांसाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागातुन मूलभूत सुविधे अंतर्गंत १० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला असल्याची माहिती उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

यामध्ये उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी, रावणगाव, सोमनाथपूर, तिवटग्याळ, हंगरगा, नळगीर, हेर, चांदेगाव, तोगरी, तोंडार, माळेवाडी, नागलगाव, वाढवणा बु., वाढवणा खु., कोदळी, पिंपरी, उमरगा, मुत्तलगाव, एकुर्कारोड, मोर्तळवाडी, शंभु उंबरगा, दावणगाव, जकनाळ, वंजारवाडी, वायगाव, नरसिंगवाडी, वाघदरी, कासराळ, लोहारा, करवंदी, करखेली, गुडसुर, हाळी, खेर्डा, मलकापूर, केसगीरवाडी, येणकी, हणमंतवाडी, कौळखेड, जानापुर, शिरोळ जानापुर, डाऊळ, हैबतपुर, अरसनाळ, डोंगरशेळकी, रुद्रवाडी, देऊळवाडी, अनुपवाडी, तादलापुर, धोंडीहिप्परगा, आदी ५६ गावे तर जळकोट तालुक्यातील चेरा, जगळपुर, डोमगाव, हळदवाढवणा, होकर्णा, उमरगा रेतु, मंगरूळ, जंगमवाडी, माळहिप्परगा, तिरुका, केकतसिंदगी, वांजरवाडा, शेलदरा, हावरगा, धामणगाव, जिरगा, विराळ, सोरगा, घोणसी, पाटोदा बु., कुणकी, ढोरसांगवी, डोंगरकोनाळी, चाटेवाडी, कोळनुर, अतनुर, रावणकोळा, सुल्लाळी, डोंगरगाव, धोंडवाडी, पाटोदा खु., वडगाव, लाळी, येवरी, चिंचोली, खंबाळवाडी, लाळी खु., नागराळ ता. देवणी, असे ४२ गावांकरीता एकुण १० कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला असुन या गावांमध्ये मंदिर सभागृह बांधकाम करणे, शादीखाना बांधकाम करणे, सी.सी. रोड, पेव्हर ब्लॉक, महापुरुषांच्या चौकाचे सुशोभिकरण करणे, हायमॅक्स लाईट बसविणे, पुल बांधकाम करणे, मंदिर सभागृह दुरुस्ती करणे, संरक्षण भिंत बांधकाम करणे, आदी कामांसाठी हा निधी वापरला जाणार असुन यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधेचा लाभ होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

मतदारसंघाचा कायापालट करत असताना ग्रामीण भागाला केंद्रबिंदू समजून मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी शासन स्तरावरुन कोट्यवधी रुपयांचा निधी मागील चार वर्षाच्या काळात नामदार संजय बनसोडे यांनी खेचून आणून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगुन ग्रामीण भागातुन जाणारे सर्व रस्ते तालुक्याला जोडले आहेत.

ग्रामीण भागातील जनतेसाठी वीजपुरवठा, आरोग्याच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याची योजना त्यामध्ये जलजीवन मिशन, वाटरग्रीड योजना, विविध समाजाची सभागृहे, महापुरुषांचे पुतळे व चौकाचे सुशोभिकरण, अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, हायमॅक्स पोल, नाल्या आदी सोबत नागरिकांना दैनंदिन जीवनात उपलब्ध होणाऱ्या सुख सुविधा पुरविल्या असल्याने सर्वसामान्य नागरीकांतुन ना. संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.