बेटी बचाव | मुलगी झाल्यावर सरकार देणार 2 लाख रुपये, वाचा सविस्तर

Himachal CM Sukhu

Himachal CM Sukhu : हिमाचल प्रदेश सरकारने मुलींसाठी एक नवीन योजना आणली आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कुटुंबाला पहिल्या मुलीसाठी 2 लाख रुपये आणि दुसऱ्या मुलीसाठी 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

सध्या राज्यात मुलीच्या जन्मावर 35 हजार रुपयांची तरतूद आहे. आरोग्य विभागातर्फे आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी नवीन योजनेची माहिती दिली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. कार्यक्रमाचे फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत.

लिंग तपासणी आणि निदान करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देशभरात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण थांबत नाही. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

राज्यात तसेच देशपातळीवर स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना व जनजागृती केली जाते. विवाहित जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. पण खेड्यापाड्यात अनेक मुली या जगात येण्याआधीच मुलाच्या हव्यासापोटी मरतात. विविध उपाययोजनांच्या आधारे या घटनांना आळा घालणे महत्त्वाचे आहे.

Read More 

PM Mudra Loan : सरकार कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांचे कर्ज देणार, हे लोक घेऊ शकतात लाभ