NDDB कडे शासकीय दूध डेअरी लवकरच हस्तांतरित होणार : सुधाकर शृंगारे

खासदार सुधाकर शृंगारे

उदगीर : येथील शासकीय दूध डेअरी व प्लांट पुनरुज्जीवित करण्याबाबत सुरू असलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासकीय दूध डेअरी योजने ला लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे साहेब यांनी आज दि. 16 रोजी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.

ही शासकीय दूध डेअरी व प्लांट राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) कडे हस्तांतरित करून त्यांच्यासह केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प पुनरुज्जीवित करून त्याचा विस्तार करण्याबाबत मी सातत्याने प्रयत्न करत असून लवकरच ही दूध डेअरी सुरू करण्याबाबत उदगीरकरांना खासदार शृंगारे यांनी आश्वस्त केल.

1979 मध्ये या प्रकल्पाची स्थापना झाली होती. सरासरी 1 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तीन दूध प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प बंद असून तो पुनरुज्जीवित झाल्यास या भागात युवकांसाठी रोजगारनिर्मिती होऊन शेतीसाठी जोडधंदा सुरू होईल. या प्रकल्पामुळे या भागाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होईल.

याप्रसंगी एन.जे. फावडे व्यवस्थापक, बी. आर. सूरवसे, नितीन राऊत दूध संघ पर्यवेशक्षक, संतोष कुलकर्णी, मोतीलाल डोईजोडे, ओंकार गांजुरे, विनोद मिंचे, चंद्रकांत टेंगटोल यांच्यासह शासकीय दूध डेअरी पुनर्वसन समितीचे सदस्य उपस्थित होते.