महाराष्ट्राच्या राजकारणात बॉलीवूड अवतरले; गोविंदा, करीना कपूर, करिश्मा कपूर शिंदे गटात जाणार

Govinda, Kareena Kapoor, Karishma Kapoor will join Shinde shiv sena

Govinda, Kareena Kapoor, Karishma Kapoor join Shiv Sena | दिग्गज नेते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अभिनेत्री करीना कपूर, अभिनेत्री करिश्मा कपूर, अभिनेता गोविंदा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम हेही आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. याचा उल्लेख मुख्यमंत्री या पत्रकार परिषदेत करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा हिरो यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

गोविंदा यापूर्वी काँग्रेस पक्षाचे खासदारही राहिले आहेत. त्यानंतर ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांना मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोघी बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तेही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

उमेदवारी दिल्यास गोविंदा जिंकेल?

शिवसेनेच्या शिंदे गटाने काल स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 40 नेत्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या स्टार प्रचारकांमध्ये बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश असेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नागरिकांचे सिनेकलाकारांवर खूप प्रेम आहे. लोकांना त्यांचे काम आवडते. त्यामुळे राजकारणातही त्याचा उपयोग होऊ शकतो. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे गोविंदा हिरो यापूर्वी खासदार म्हणूनही निवडून आला आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रेक्षक त्यांना उमेदवारी मिळाल्यास लोकसभेत पाठवतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संजय निरुपम काँग्रेसवर नाराज 

काँग्रेस नेते संजय निरुपम हे पक्षाचे माजी खासदार आहेत. ते राज्यसभेचे खासदारही होते. त्यांची मुंबईत चांगली ताकद आहे. मात्र ठाकरे गटाने महाविकास आघाडीने दावा केलेल्या जागेवर उमेदवार जाहीर केल्याने संजय निरुपम नाराज झाले आहेत. ठाकरे गटाचा उमेदवार म्हणून काम करणार नसल्याचे त्यांनी काल जाहीर केले होते. त्यानंतर ते आज शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.