मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, नेमके काय म्हटले याचिकेत?

Gunaratna Sadavarte has filed a petition against the Maratha movement.

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आणि समाजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसून सरकारला कोंडीत पकडले आहे. एकीकडे आरक्षणाचा लढा तीव्र होत असतानाच मराठा आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. जरंगे पाटलांच्या उपोषणाला राज्यभरातील मराठा बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे. जरंगे यांच्या आवाहनानंतर राज्यातील गावांमध्ये आरक्षणासाठी सुरू असलेली आंदोलने आणि हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

मराठा आंदोलकांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते हे वारंवार मराठा आरक्षणाला विरोध करताना आणि मनोज जरांगे यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. या भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी सदावर्तणे गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.