Sangli News | डीजेच्या दणदणाटाने हार्ट अटॅक, गणेश विसर्जन मिरवणुकीत सांगली जिल्ह्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sangli News

सांगली : सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा आकस्मिक मृत्यू (सांगली वार्ता) गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाटही दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. तासगाव तालुक्यातील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधरी येथील प्रवीण शिरतोडे (वय 35, रा. दुधरी) यांची सोमवारी रात्री हत्या झाली. हे दोघे सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने विचलित होऊन दोघांचा मृत्यू झाला. त्यापैकी शेखर पावशे यांची 10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

डीजेच्या आवाजाने बेचैनी 

दुधारी येथील प्रवीण शिरतोडे यांचा सेंटरिंगचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री सात वाजता ते कामावरून घरी येत होते. घरी परतत असताना त्यांची दुचाकी रस्त्यात बंद पडली. त्यामुळे दुचाकीला लांब ढकलत तो घरी पोहोचला. परिसरात मंडळाची मिरवणूक असल्याने जेवणाचा डबा आणि गाडी घरीच ठेवून लगेच मिरवणुकीत सामील झाले.

दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला डीजेच्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागले. मित्रांसोबत नाचत असताना त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती

कवठेएकंद येथील शेखर या तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. मिरवणुकीत डीजेचा मोठा आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आनंदाच्या वातावरणात उमद्या शेखर यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. सोमवारी रात्री शेखर गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता.

त्यावेळी विविध मंडळांसमोर जोरात गाणी वाजत होती. एकावर एक डी जे च्या साउंड बॉक्सचे थर ठेवून गाणी वाजवली जात होती. अख्खं गाव मोठमोठ्या लाऊडस्पीकरने दणाणून गेले होते. तेव्हा मिरवणुकीत फिरत असलेल्या शेखरला रात्री दहाच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात पोहोचेपर्यंत त्रास वाढत गेल्याने तो घरी परतला. घरात जाताच चक्कर आली. त्याला छातीत दुखू लागल्याने तासगावला खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

शेखर पावशे यांचा पलूस येथे चारचाकी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. तरुणाच्या अनपेक्षित मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More 

कोरोना पेक्षा 7 पट जास्त घातक महामारी येणार असल्याचा दावा? 5 कोटी लोकांचा बळी जाण्याची भीती; चिंता वाढली