छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघ नखं’ ब्रिटनमध्ये गेली कशी? काय आहे इतिहास?

Chhatrapati Shivaji Maharajs Wagh Nakh

Chhatrapati Shivaji Maharaj’s Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारण्यासाठी ‘वाघ नखं’ वापरली होती. त्या वाघ नखांना ब्रिटनमधून भारतात परत आणले जाईल. या वाघ नखांना सध्या ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट’ संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. या वाघ नखांना परत करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीला ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून महाराष्ट्र राज्य सरकार लवकरच वाघ नखांना परत आणण्यासाठी करार करणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

वाघ नखांना परत करण्याच्या कराराला अंतिम रूप देण्यासाठी मुनगंटीवार महिन्याच्या शेवटी लंडनला जाणार आहेत. या करारानंतर या वर्षाच्या अखेरीस ही ‘वाघ नखं’ भारतात परत येऊ शकतात. दरम्यान, या वाघ नखांचा आणि ब्रिटनमध्ये त्यांच्या स्थलांतराचा रंजक इतिहास आहे.

आम्हाला ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघाचा पंजा आम्हाला परत करण्याचे मान्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू दिनदर्शिकेनुसार अफझलखानाचा वध केला. त्या दिवशीच्या वर्धापनदिनानिमित्त तुम्ही ते परत मिळवू शकता. इतर काही तारखांचाही विचार केला जात असून वाघांच्या मायदेशी परतण्याची पद्धतही ठरविण्यात येत आहे. – मंत्री, सुधीर मुनगंटीवार

वाघ नखांचा इतिहास काय आहे?

वाघ नखं हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे शस्त्र आहे. हे शस्त्र मुठीत सहज लपवता येते. ही वाघ नखं वाघाच्या पंज्या सारखे तीक्ष्ण पंजे असतात. मूठ आवळल्यानंतर, ती मुठीत सहज लपविली जातात. हे शस्त्र हातात धारण केल्यानंतर, तर्जनी आणि करंगळी बोटांमध्ये अंगठी ठेवल्यासारखे दिसते. मराठा साम्राज्याच्या काळात अनेक प्रकारची वाघ नखं युद्धात वापरली गेली. त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारण्यासाठी वापरलेली ‘वाघ नखं’ सर्वाना जास्ती माहित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर ‘वाघ नखं’ हे महत्त्वाचे शस्त्र म्हणून चर्चेत आले.

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं ‘या’ तारखेला महाराष्ट्रात येणार

अफझलखानाचा वध ही मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना होती. अफझलखान हा एक शक्तिशाली मुघल सरदार होता. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटायला आले होते, त्यावेळी अफजलखानाने शिवाजी महाराजांना गळा भेट घेताना मिठीत धरून त्यांची मान दाबली होती. शिवाजी महाराजांनी खानाची चाल ओळखून आपल्या हातातील वाघ नखांचा पंजा अफजलखानाच्या पोटात घातला आणि त्याचा कोथला बाहेर काढला.

वाघ नखं ब्रिटनमध्ये कशी गेली?

महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची वाघ नखं आणि भवानी तलवार राज्यात परत आणणार आहे. पण महाराजांनी वापरलेला वाघ नखांचा पंजा ब्रिटनमध्ये कसा गेला असा प्रश्न पडतो. त्यामागेही एक रंजक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. या संग्रहालयात महाराजांची वाघनखं कशी आली याचा इतिहास जाणून घेऊया.

जेम्स ग्रँड डफ कोण आहे?

इंग्लिश लेखक ‘जेम्स ग्रँड डफ’ यांनी वाघनखं ब्रिटिश म्युझियममध्ये आणली. 1818 मध्ये सातारा प्रांतातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी डफची नियुक्ती करण्यात आली होती. जेम्स ग्रँड डफचाने इ.स. 1818 ते 1824 या काळात त्यांनी सातारा येथील ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय प्रतिनिधी म्हणून काम केले. छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संबंधांच्या राजकीय घडामोडी ते पाहत होते, असा दावाही अनेक ठिकाणी करण्यात आला आहे. दरम्यान, जेम्स ग्रँड डफला इतिहासात रस होता. त्यांनी मराठा इतिहासावर लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेले ‘मराठ्यांचा इतिहास’ हे मराठी इतिहासावर लिहिलेले पहिले पुस्तक आहे. त्यामुळे त्यांना मराठी इतिहासाचे पहिले इतिहासकार मानले जाते.

वाघनखं भेट मिळाली

जेम्स ग्रँड डफ यांचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रतापसिंह महाराजांकडून त्यांना शिवाजी महाराजांची वाघनखं भेट म्हणून मिळाला असावी असे काही ठिकाणी लिहिले आहे. काही ठिकाणी केलेल्या दाव्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी त्यांना ही वाघनखं भेट म्हणून दिले असल्याचे लिहिलेले आहे. जेम्स ग्रँड डफ ब्रिटनला गेल्यावर वाघनखं सोबत घेऊन गेला. त्यानंतर त्याच्या वंशजांनी ते व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाला दान केले.

Read More

राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवले जाणार? दोन्ही पवार गटाकडून नव्या चिन्हांचा शोध