आज उदगीर शहरातील अद्यावत सांस्कृतिक सभागृहांचा लोकार्पण सोहळा

उदगीर : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा ना श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेले उदगीर शहरातील अद्यावत सांस्कृतिक सभागृहांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा ना श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या शुभहस्ते शनिवार दि. 21 ऑक्टोंबर रोजी संपन्न होत आहे . सकाळी 10.30 वाजता संजय नगर येथील साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह व सकाळी 11.30 वाजता म्हाडा कॉलनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.

तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मा. नगरसेवक, मा. पंचायत समिती सदस्य, मा. जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शहर, तालुका, जिल्हा व प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल, राष्ट्रवादी ओबीसी विभाग, राष्ट्रवादी व्हीजेएनटी विभाग, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी डॉक्टर्स विभाग, राष्ट्रवादी कामगार विभाग व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, ही विनंती.