भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रदेशाध्यक्षांसमोरचं दोन गटांची घोषणाबाजी

Internal disputes in BJP on rise; Slogan fight of two groups in front of state president

State President Chandrasekhar Bawankule | नगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षाच्या निवडीनंतर पक्षाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यात झालेल्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. दोन्ही गटाच्या समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड करायची यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता. नवीन निवडणुकांसाठी सर्वांनी स्थानिक ताकद लावली होती. आपापल्या तालुक्‍यातील गटातटाचे राजकारण लक्षात आल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या सोयीचे जिल्हाध्यक्ष व्हावे असे वाटत होते आणि त्यामुळे चांगलीच लढत झाली. आता जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका झाल्या मात्र दुसरीकडे कार्यकारिणी नसल्यामुळे आणि निवडणूक योग्य पद्धतीने न झाल्यामुळे भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

भाजपच्या उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा अद्याप बाकी आहे. अशा स्थितीत पक्षांतर्गत राजकारणामुळे आमदार मोनिका राजळे यांना दक्षिण नगर जिल्ह्यातील जाहीर झालेल्या कार्यकारिणीत शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील पदाधिकारी निवडीला स्थगिती द्यावी लागली. त्यामुळे मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.

मुंडे गटाच्या गोकुळ दौंड, अरुण मुंडे, बाळासाहेब सोनवणे, वैद्य आदी संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी पारनेर, राहुरी व शेवगाव-पाथर्डी येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी शेवगाव-पाथर्डीच्या असंतुष्ट गटाने बावनकुळे यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर बावनकुळे यांच्या ताफ्यातील राजळे यांनी त्यांच्या पदांवर निलंबनाची कारवाई केली, मुंडे यांच्यावर निष्ठावान असलेल्या जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे अमर असल्याची घोषणा करून ताकद दाखवली. त्यामुळे भाजपमधील भ्रष्टाचार उघड झाला आहे.

Read More 

अर्थखाते राहील की नाही, सांगता येत नाही : अजित पवार यांच्या धक्कादायक वक्तव्याने राजकीय चर्चांनी उधाण