Jio Air Fiber : जिओ फायबरची बाजारात धमाकेदार एन्ट्री, स्पीड आणि प्लान बद्दल जाणून घ्या

JIO Air Fiber Launch

JIO Air Fiber Launch : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशातील 8 शहरांमध्ये जिओ एअर फायबर लाँच करण्यात आले आहे. जिओ एअर फायबर हा एंड-टू-एंड सोल्यूशन आहे. तुम्हाला होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सुविधा मिळतील.

कंपनीने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे या 8 मेट्रो शहरांमध्ये जिओ एअर फायबर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिओ कंपनीने एअर फायबर (Air Fiber) आणि एअर फायबर मॅक्स (Air Fiber Max) नावाचे दोन नवीन प्लान सादर केले आहेत. या एअर फायबर प्लॅनमध्ये ग्राहकाला 30Mbps आणि 100Mbps असे दोन प्रकारचे स्पीड प्लॅन मिळतील. तसेच, या प्लॅनची सुरुवातीची किंमत 599 रुपये असेल.

त्याची किंमत 30Mbps साठी 599 रुपये आणि 100Mbps साठी 899 रुपये आहे. दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 550 हून अधिक चॅनेल आणि 14 ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. एअर फायबर प्लॅनमध्ये कंपनीने रु.1999 चा प्लान 100 Mbps स्पीड सह देखील सादर केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला चॅनेल, Netflix, Amazon आणि Jio Cinema चे सबस्क्रिप्शन मिळेल.

1. AirFiber Max योजनेची किंमत

ज्या ग्राहकांना जास्त इंटरनेट स्पीड हवा आहे त्यांनी ‘AirFiber Max’ प्लान निवडावा लागेल. Jio ने बाजारात 300 Mbps ते 1000 Mbps, 1Gbps पर्यंतचे तीन शक्तिशाली प्लॅन लॉन्च केले आहेत. यामध्ये तुम्हाला 1499 रुपयांमध्ये 300 Mbps स्पीड मिळेल. 500 Mbps पर्यंतचा स्पीड 2499 रुपयांना मिळेल आणि जर वापरकर्त्यांना 1Gbps स्पीड प्लॅन घ्यायचा असेल तर त्यांना 3999 रुपये खर्च करावे लागतील.

जिओचा हा प्लॅन संपूर्ण भारतात 1.5 लाख किमीपेक्षा जास्त पसरलेला आहे. कंपनीने आतापर्यंत 1 कोटींहून अधिक परिसर Jio Fiber द्वारे जोडले आहेत. जर तुम्हाला जिओ एअर फायबर घ्यायचे असेल तर ते ऑनलाइन आणि ऑफलाइन बुक केले जाऊ शकते. यासाठी तुम्ही जिओच्या साइट्सला भेट देऊ शकता किंवा स्टोअरमध्ये खरेदी करू शकता.