ज्योती राठोड यांना लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड 2024 पुरस्कार देऊन गौरव

Jyoti Rathod honored with Lokmat Women Achievers Award 2024

लातुर : लोकमत सखी मंच लातूरच्या वतीने आयोजित मोठ्या दिमाखात पार पडलेल्या रंगारंग सोहळ्यात ‘लोकमत वुमेन ॲचिव्हर्स अवॉर्ड २०२४’ हा पुरस्कार सौ. ज्योती बापूराव राठोड माजी सभापती, जि.प. लातूर यांचे ना. संजयजी बनसोडे साहेब, क्रीडा व युवक कल्याण तथा बंदरे मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून लातुर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर, अनमोल सागर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद मतदार संघातून 2017 मध्ये जि. प. सदस्य म्हणुन निवडून आलेल्या सौ. ज्योतीताई राठोड यांनी त्यांचे पती बापुराव राठोड माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती जि. प. लातुर यांच्या मार्गदर्शनाखाली व सोबतीने त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहेत. त्यांचे कार्य पाहूनच त्यांना पक्षाने व मा. आ.संभाजी पाटील निलंगेकर माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी 2020 मध्ये लातुर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पदाची जबाबदारी सोपविली होती.

महिला व बालकल्याण सभापती पदाच्या कार्यकाळातही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सभापती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांना स्वतः भेटी देऊन त्याचे निरीक्षण केले व त्या निरीक्षणामध्ये त्यांनी अंगणवाड्यामधील अनेक समस्या पाहिल्या. अंगणवाड्या मध्ये सुधारणा करण्याचे त्यांनी ठरविले व त्यासाठी त्यांनी तत्कालीन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हॅपी अंगणवाडी योजना सुरू केली.

त्यामध्ये त्यांनी हॅपी होम अंगणवाडी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1100 अंगणवाड्यांना नवीन रूप देण्याचे कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्यासाठी लातूर जिल्हा परिषद व त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई येथे 08 मार्च 2022 रोजी उप मुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. तसेच मतदारसंघातील प्रत्येक गावच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी आणून गावांचा कायापालट केलेला आहे.

गावांचा विकास करत असताना त्यांनी त्यामध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, या सर्व बाबींचा अभ्यास करून विकास केला आहे. कोविड-19 कोरोनाच्या काळातही त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून प्रत्येक गावागावात जाऊन तेथील नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला, औषध इ चा पुरवठा स्व: खर्चाने केला आहे. महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.

त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत लोकमत सखी मंच लातूरच्या वतीने त्यांना लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड 2024 हा पुरस्कार दिला आहे. सौ ज्योती बापुराव राठोड यांच्यासह या सोहळ्यात जिल्हयातील इतरही कर्तृत्वान महिलांचा गौरव करण्यात आला. हा सोहळा शनिवार ( 9 मार्च) रोजी कार्निवल रिसोर्ट, अंबाजोगाई रोड, लातुर येथे संपन्न झाला.

त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे राहुल केंद्रे मा.अध्यक्ष जि. प. लातूर, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, बालाजी केंद्रे, सत्यवान पांडे, संजय पाटील मलकापूरकर, यांच्यासह निडेबन जिल्हा परिषद गटातील निडेबन, जानापुर, शिरोळ जा., चांदेगाव, कुमदाळ, गुरधाळ ,लिंबगाव, तोंडचिर, कौळखेड, शेल्हाळ, गायमाळ तांडा, रामघाट तांडा, बॉर्डर तांडा, मल्लापुर, मंचा तांडा, नागलगाव, माळेवाडी , मादलापुर, बामणी, मोघा, तोगरी येथील सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले आहे.