स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्या दि. 9 रोजी उदगीर येथे होणार उद्घाटन

  • राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ऐतिहासिक उदगीर नगरी सज्ज

लातूर : क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय, स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्यावतीने आयोजित स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ऐतिहासिक उदगीर नगरी सज्ज झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज, 9 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार रमेश कराड, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धिरज विलासराव देशमुख, लातूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका बाबासाहेब मनोहरे, अर्जुन पुरस्कारार्थी काकासाहेब पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 Khashaba Jadhav Cup state level wrestling tournament will be inaugurated today at Udgir

उदगीरमधील जिल्हा परिषद मैदानावर या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तयारीचा आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस व युवराज नाईक, माजी उपसभापती बाळासाहेब मरालापल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रत्यक्ष भेट देवून तयारीची पाहणी केली.

कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या कुस्ती स्पर्धेत 10 जिल्ह्यातून प्रत्येकी 36 खेळाडू असे एकूण 360 खेळाडू उदगीर शहरात दाखल झाले आहेत. या स्पर्धेला लातूर जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव पै. योगेश दोडके, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक जगन्नाथ लकडे, लातूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव शिवरुद्र पाटील यांनी केले आहे.