राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील 8 आमदारांना विधिमंडळाची नोटीस

Sharad Pawar to give 70% permanent reservation on the lines of Tamil Nadu State Maharashtra Govt

Maharashtra Political News: राज्यातील राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या आठ आमदारांना विधिमंडळाने नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाच्या आमदारांना पक्षविरोधी कारवायांसाठी अपात्र का ठरवू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधिमंडळात दाखल केली.

त्यानंतर विधीमंडळाने शरद पवार गटाच्या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. शरद पवार यांचा गट लवकरच विधिमंडळाच्या नोटिशीला उत्तर देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शरद पवार गटातील 10 आमदारांना विधिमंडळाने आतापर्यंत नोटिसा बजावल्या आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आवाड यांना विधिमंडळाने यापूर्वीच नोटीस बजावली आहे. त्याचवेळी शरद पवार गटाचे अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना विधिमंडळाने नोटीस बजावलेली नाही. नवाब मलिक यांनी तटस्थ राहणे पसंत केले, परंतु त्यांना कोणतीही नोटीस बजावली गेली नाही.

अजितदादा मुख्यमंत्री होतील, धर्मरावबाबा आत्राम यांना विश्वास

‘या’ आमदारांना बजावली नोटीस

1) अनिल देशमुख

2) राजेश टोपे

3) सुनिल भुसारा

4) प्राजक्त तनपुरे

5) रोहित पवार

6) सुमन पाटील

7) बालासाहेब पाटील

8) संदीप क्षिरसागर