लोकसभा लढणार की नाही? भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

भाजप नेत्या पंकजा मुंडे

मुंबई : बीडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ते लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? यावर पहिली प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पाकंजा मुंडे म्हणाल्या…भाजपचे सगळे निर्णय दिल्लीत होय.

प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा होत असते, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रश्नावर दिली आहे. प्रीतम मुंडे या 10 वर्षांपासून लोकसभेच्या खासदार आहेत. राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. मी राज्यातच नाही तर देशात स्टार प्रचारक राहिले आहे.

त्यामुळे माझा लोकसभेचा उमेदवार कोणीही असला तरी मी स्टार प्रचारक असेन आणि सर्व जबाबदारी माझीच असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढील काळात राष्ट्रवादीची युती झाली तर त्यांचा स्टार प्रचारक कोण असेल हे ते ठरवतील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.