Maharashtra Drought | महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, दुष्काळ निवारणासाठी मंत्रालयात उभारले ‘वॉर रूम’

Maharashtra Drought

Maharashtra Drought : यंदा मान्सूनचा पाऊस लांबला. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली. मात्र, त्यानंतरही अतिवृष्टीमुळे पिके करपून गेली. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने मंत्रालयात वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज या वॉर रूममधून राज्याचा आढावा घेणार आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सरासरी पर्जन्यमानात मोठी तूट निर्माण झाली आहे. सर्वात वाईट परिस्थिती मराठवाड्यात आहे.

कारण सरासरीच्या केवळ २८ टक्केच पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यभरातील सरासरीच्या उणे २० टक्क्यांहून अधिक तूट आहे. या प्रचंड तुटीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Politics | अजित पवार गटाला पक्षासोबत चिन्ह देखील मिळेल : प्रफुल्ल पटेल यांचा दावा

ऑगस्ट महिन्यातही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी पेरलेली खरीप पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. कमी पावसामुळे बाजरी, मूग, कापूस, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावणीची मागणी आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

दुष्काळ निवारणासाठी सरकार आतापासूनच तयारीला लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर दुष्काळ निवारणाच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येऊ नये आणि काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी सरकारने ‘वॉर रूम’ स्थापन केली आहे.

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून या वॉर रूमचे नियंत्रण केले जाईल. त्यासाठी काही अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. या वॉर रूममधून टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रूमशी संलग्न होणार आहे.

मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये प्रत्येक जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकर, चारा छावण्या, पिकांची पाहणी केली जाईल. दुष्काळग्रस्त गावे, तालुके, जिल्हे, विभाग यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

Read More

Jan Dhan Yojna : पंतप्रधान जन धन योजनेला 9 वर्षे पूर्ण, रचला बॅंकिंग क्षेत्रात मोठा इतिहास, जाणून घ्या योजनेचे फायदे