मराठा आरक्षण आंदोलन तापले, पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

मराठा आरक्षण आंदोलन

पुणे, 3 सप्टेंबर | मराठा आरक्षण आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तसेच मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्या या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर, जालन्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे एसटी बससेवा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. पुण्याहून एसटीने छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे जाणारे अनेक प्रवासी अडकून पडल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड परिसरातील एसटी बसेस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. या भागातून दररोज 600 एसटी बसेस सुटतात. याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.

Read More 

Ayodhya Ram Mandir | संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? नितेश राणे यांचा सवाल