Nagpur Crime | नागपुरात महिलेकडून 36 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

MD drugs worth 36 lakhs seized from woman in Nagpur, big police action

नागपूर : नागपुरात एका महिलेकडून 36 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत मिसाळ ले-आऊटमध्ये ही कारवाई करण्यात आली. मिसाळ लेआऊट परिसरात भाड्याच्या घरात राहणारी महिला एमडी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 364 ग्रॅम (किंमत 36 लाख 88 हजार रुपये) एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

याबाबत जरीपटका पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रदीप किटे यांनी सांगितले की, जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब टेकाडे यांना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रक्रिया पूर्ण करून, एमडीने ड्रग्ज जप्त करण्यासाठी मोठी कारवाई केली. यामध्ये 36 लाख 88 हजार 715 रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एमडी ड्रग्ज व्यावसायिक प्रमाणात पकडण्यात आले. 364.90 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

संबंधित महिला रेकॉर्डेड गुन्हेगार आहे. तिला अटक करण्यात आली आहे. आम्हाला महिलेची पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. ही महिला आमच्या ताब्यात आहे. पीएसआय किटे पुढे म्हणाले की, तपास सुरू असून जी काही माहिती मिळेल ती लवकरच दिली जाईल.

महिलेची मोडस ऑपरेंडी

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित महिला चार ते पाच दिवस एका खोलीत राहायच्या. तिथूनच ती आपले काम करत असल्याचे तपासातून समोर आले आहे. तिने हा माल कोठून आणला आणि कुठे विकला हे अद्याप स्पष्ट झाले नाही, तपास सुरू आहे. सध्या ही महिला मिसाळ ले-आऊट परिसरात भाड्याने राहत होती, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रदीप किटे यांनी दिली.

Read More 

Crime News | चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक