Mumbai Crime: गळ्यावर चाकू लावून 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; मुंबई पुन्हा हादरली

मुंबई : देशातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर मुली आणि महिलांसाठी असुरक्षित होत आहे का? कारण गेल्या काही आठवड्यातील घटना पाहिल्यावर असे वाटते. मुंबईतील मुलुंड बलात्काराचे एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे.

एका 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आईला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने मुलुंडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल 

मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत असतानाच आता पुन्हा एकदा जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडून हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खेळण्या बागडण्याच्या वयातील मुलं कोणत्या थराला जात आहेत, हे लक्षात येते. या घटने वरून आता पालकांच्या चिंतेत नवीन भर पडली आहे.

आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. आईला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक परदेशात रवाना झाले आहे. अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवेगळ्या अंगांनी तपास सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतील महिलांची सुरक्षितता धोक्यात  

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगार मुंबईत कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा गुन्हेगारांवर कसलाही धाक राहिलेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.