केरळमध्ये ‘निपाह’ अलर्ट, दोन रुग्णांचा संशयास्पद मृत्यू

'Nipah' alert in Kerala

‘Nipah’ alert in Kerala | केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात तापामुळे दोन रुग्णांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तापामुळे मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांना निपाह व्हायरसची लागण झाली असावी, असा संशय आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने निपाह अलर्ट जारी केला आहे.

कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात तापामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तत्सम लक्षणे असलेल्या तीन मुलांसह चार मुलांवर उपचार सुरू आहेत. मृतांपैकी एक 22 वर्षीय तरुण असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सर्व रुग्णांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

आज (ता. 12) सायंकाळपर्यंत रुग्णाचा अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर निपाह विषाणूची लागण झाली होती की नाही, याची खात्री केली जाईल, असे केरळ आरोग्य विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. कोझिकोडला यापूर्वी दोनदा म्हणजे २०१८ आणि २०२१ मध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.

निपाह विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, निपाह व्हायरस हा एक झुनोटिक विषाणू आहे, म्हणजे तो प्राणी आणि लोकांमध्ये पसरू शकतो. हा हवेतून होणारा संसर्ग नाही. तथापि, ते दूषित अन्नाद्वारे किंवा थेट व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये प्रसारित केले जाऊ शकते. निपाह विषाणू डुकरांना आणि मानवांमध्ये रोग निर्माण करण्यासाठी देखील ओळखले जाते. निपाह हे नाव मलेशियातील एका गावाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. येथे या विषाणूमुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला.

Read More 

पंचनामा | अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे ही ‘आयडिया’ कोणाची?