Wife Swapping Party पोलिसांनी उधळली, आठ जणांना अटक, सुरु होते मोठे सेक्स रॅकेट

Police Raid Wife Swapping Party, Eight Arrested, Exposed Big Sex Racket

Crime News | वाईफ स्वॅपिंग पार्टीचा (Wife Swapping Party) पोलिसांनी पर्दाफाश केला असून ही अदलाबदली करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईच्या ईस्ट कोस्ट परिसरात हा प्रकार घडला आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. याबाबत एका स्थानिकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. ‘वाईफ स्वॅपिंग’च्या (Wife Swapping Party-पत्नीची आप आपसात आदला बदल) नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे ते चेन्नईच्या अनेक भागात पत्नी स्वॅपिंग पार्ट्यांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत आहेत. कोईम्बतूर, मदुराई, सालेम या भागात ‘वाईफ स्वॅपिंग’ पार्ट्यांच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी आता या आठ जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सेंथिल कुमार, चंद्रमोहन, कुमार, शंकर, वेलराज, पेरासन, सेलवन आणि व्यंकटेश कुमार या आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी अविवाहित तरुणांची हेरगिरी करायचे आणि काही महिलांशी त्यांची ओळख करून देत. हे सर्वजण ‘वाईफ स्वॅपिंग पार्टीज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवतात. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

सोशल मीडिया पेजही बनवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी ‘वाईफ स्वॅपिंग’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवण्यासाठी सोशल मीडिया पेजही तयार केले होते. त्याद्वारे तो वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. पुरुषांकडून 13 ते 25 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर पुरुषांची महिलांशी ओळख झाली.

एखादा पुरुष महिलेच्या जाळ्यात अडकल्यावर त्याला इतर महिलांचेही आमिष दाखवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे. तसेच 30 ते 40 वयोगटातील महिलांचीही सुटका करण्यात आली. या महिला विवाहित असून त्यांना पैशाचे आमिष दाखविण्यात आल्याचेही समजते. हे सर्व एका फ्लॅटमध्ये सुरू होते.

या प्रकरणी शेजाऱ्यांनी सजगता दाखवत पोलिसांना बोलावले. त्यांना सगळं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या फ्लॅटमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात पुरुष आढळून आले. तसेच घरात गाणी वाजवली जात होती आणि दारूही दिली जात होती. एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पत्नी स्वॅपिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली आहे.