Politics | पुन्हा एकदा ओवैसींसमोर त्यांच्याचं सभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा

Asududdin Owaisi

डुमरी, 31 ऑगस्ट : झारखंडच्या डुमरीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्या ठिकाणी एआयएमआयएमने आपला उमेदवार उभा केला आहे. अब्दुल मोबीन रिझवी यांना एआयएमआयएमचे तिकीट देण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी (Asududdin Owaisi) यांनी त्यांच्या प्रचारासाठी बुधवारी जाहीर सभा घेतली. असदुद्दीन ओवेसी जाहीर सभेला संबोधित करत होते.

त्यावेळी जाहीर सभा ऐकण्यासाठी आलेल्या काही लोकांनी ‘पाकिस्तान’ झिंदाबादच्या घोषणा दिल्या. ही घोषणा ऐकताच ओवेसींनी त्यांना चांगलेच झापले, त्यांच्या घोषणा थांबविल्या. असुदुद्दीन ओवेसी घोषणा देणाऱ्यांना म्हणाले, तुम्ही शांत राहा आणि मी काय म्हणतो ते ऐका!

सभेतील ओवेसींच्या आपत्तीजनक घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घोषणा कोणी दिल्या? त्यांना शोधून कारवाई करण्यासाठी डुमरी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. ओवेसींच्या सभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचे भाजपने म्हटले आहे.

शरद पवार यांचा मोठा निर्णय : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे

सभेत आपत्तीजनक घोषणा होऊन सात तास उलटून गेले, तरी अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही प्राथमिक तक्रार दाखल झालेली नाही. त्यांना अटक करण्यात आलेली नाही. हे खेदजनक आहे; झारखंड असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शाहदेव यांनी म्हटले आहे.

भाजपाची प्रतिक्रिया

झारखंड सरकारने आरोपींवर कडक कारवाई करावी, अशा उपद्रवी लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे; भाजपचे प्रदेश प्रवक्ते शाहदेव यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. गिरीडीहचे एसपी दीपक शर्मा आणि डुमरी एसडीएम शेहजाद व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आहेत. देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओवेसींसमोर हे पहिल्यांदाच घडलं आहे का?

यापूर्वी AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी गेल्या वर्षी 2022 मध्ये मंदार पोटनिवडणुकीच्या वेळी रांची विमानतळावर पोहोचले होते. त्यावेळी विमानतळावर उपस्थित त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. ओवेसी झारखंडमध्ये आल्यानंतरही अशा प्रकारची घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे एआयएमआयएमचा निवडणुकीत पराभव होऊ शकतो. यावर ओवेसी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

राम मंदिर उद्घाटनावेळी धर्मांधतेचा आगडोंब उसळेल : संजय राऊतांचा गंभीर आरोप