प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi

रेणापूर तालुक्यातील 3 हजार 579 शेतकऱ्यांची केवायसी बाकी

लातूर| शासनाच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला 6 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते, तर नमो शेतकरी महाकिसान योजनेंतर्गत राज्य शासनाच्यावतीने 6 हजार दिले जातात. त्यासाठी मात्र, केवायसी करणे बंधनकारक असून, रेणापूर तालुक्यात 3 हजार 579 शेतकन्यांचे केवायसी शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार आहे.

शेतकन्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महाकिसान योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. दोन्ही प्रत्येकी योजनेतर्गत सहा हजार रुपये देण्यात येतात. परंतु त्यासाठी बैंक खाते आधारशी लिंक करण्यासह आवश्यक ती प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी अनेक वेळा शासनाने मुदतवाढही दिली. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांचे केवायसी करणे बाकी आहे.

1 हजार 815 शेतकऱ्यांचे आधार लिंक करणे बाकी 

रेणापुर तालुक्यात 1 हजार 815 शेतकऱ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक केलेले नाही. त्यामुळे अनुदान वाटपासह इतर कार्यालयीन प्रक्रियेत अडचणी येत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने अनेक वेळा जनजागृती केली आहे. परंतु अजूनही तालुक्यात 3 हजार 579 शेतकऱ्यांचे ईकेवायसी आणि 1 हजार 815 शेतकयांचे बँक खात्याशी आधार नंबर जोडण्यात आलेला नाही. तरी अद्याप केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महाकिसान घेण्यासाठी केवायसी करून घ्यावे, असे अवाहन रेणापूर तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.