मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे; फोटो पाहून पालक संतप्त

शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे

बेंगळुरू: कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबित करण्यात आले आहे. शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थ्याचे चुंबन घेऊन गैरवर्तन केल्याचा आरोप मुख्याध्यापिकेवर आहे. शाळेतील एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. तो व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई केली.

मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याचे चुंबन घेत त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा फोटो बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विद्यार्थ्याचे आई आणि वडील शाळेत पोहोचले. त्यांनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर चिक्कबल्लापूरच्या शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. शाळेच्या सहलीदरम्यान मुख्याध्यापिकेने काढलेले काही फोटो आणि व्हिडिओ डिलीट केल्याचे तपासात समोर आले आहे.

हटवलेले फोटो आणि व्हिडिओ रिस्टोअर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करून बीईओने अहवाल सादर केला आहे. त्यानंतर मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले. शाळेची सहल 22 ते 25 डिसेंबर दरम्यान होरानाडू, याना व इतर ठिकाणी गेली. या सहलीदरम्यान मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. त्याचा फोटो दुसऱ्या विद्यार्थ्याने काढला होता. दोन विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता इतर कोणालाही फोटो आणि ते कसे झाले याची कल्पना नव्हती.